विद्यापीठ गीत

विद्यापीठ गीत

एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना ।
चिरंतन ज्ञानाची साधना । 
ज्ञान हेच संजीवन साऱ्या जगताच्या जीवना ।। धृ ।।

ज्योत जागवू सुजाणतेची सकलांच्या अंतरी |
तीच निवारील पटल तमाचे प्रभात सूर्यापरी |
ज्ञानच देऊळ, ज्ञानच दैवत, प्रगतीच्या पूजना || १ ||

नव्या युगाचा नव्या जगाचा ज्ञान धर्म आहे |
त्यातच आमुच्या उजळ उद्याचे आश्वासन राहे |
मुक्त करील तो परंपरेच्या बंदिघरातुन मना || २ ||

हाच मंत्र नेईल आम्हाला दिव्य भविष्याकडे |
न्यायनितीचे पाऊल जेथे भेदाशी ना अडे |
जे जे मंगल पावन त्याची जेथे आराधना || ३ ||

                            कुसुमाग्रज 

University Song : Gist

We pledge to pursue knowledge, eternally and incessantly. Knowledge being omnipresent, we will strive to enlighten the flame of prudence forever in our hearts. Radiance of knowledge will overcome the darkness. Knowledge is the Temple; Knowledge is the Deity in the worship of progress. Knowledge being the religion of new universe and new era; it promises us of brighter future, by liberating our minds from the confines of tradition. Incantation of knowledge will lead us to footsteps of justice and a glorious future. Knowledge alone would incline us to worship everything auspicious and pure.