विद्याशाखेची माहिती
कृषी विज्ञान विद्याशाखा
कृषी विज्ञान विद्याशाखेची स्थापना सन १९८९ मध्ये झाली सन १९९० मध्ये विद्यार्थी संख्या केवळ ८१ होती. पुढे विद्यार्थी नोंदणी संख्येने अशी झेप घेतली की २००८ पासून सरासरी २०,००० विद्यार्थी प्रती वर्षी नोंदणी करू लागले. गेल्या पंचवीस वर्षातील एकत्रित नोंदणी 3,90,000 एव्हढी झाली आहे
शेतकरी समूहाला शाश्वत शैक्षणिक पाठबळ आणि ते घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात या विद्याशाखेस मोठे यश आले आहे. महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची उदासीनता कमी करण्यासाठी शाश्वत कृषी शिक्षण देण्यात ही विद्याशाखा यशस्वी झाली आहे
पारंपारिक शिक्षण पद्धतीतून गळालेल्या बहुसंख्य वंचीतांपर्यंत, प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत, शेतकरी महिलांपर्यंत आणि ग्रामीण युवकांपर्यंत मराठी भाषेतून कृषीशिक्षण पोचवण्याची कार्यप्रणाली या विद्याशाखेने अवलंबिली आहे.