विद्यापीठाची माहिती

विद्यापीठाची माहिती

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना 1 जुलै १९८९ रोजी महाराष्ट्र शासनाच्या कायदा क्रमांक XX (1989) अन्वये झाली. हे भारतातील ५ वे मुक्त विद्यापीठ आहे. 

ह्या विद्यापीठाची कार्य कक्षा संपूर्ण महाराष्ट्र आहे. यचममुवि ला विद्यापीठ अनुदान अयोगाच्ग्या कलम १२ (ब) अन्वये मान्यता आहे. हे विद्यापीठ अनेक मान्यवर संस्थांचे सदस्य आहे. जसे की Association of Indian Universities (AIU), Association of Commonwealth Universities (ACU), Asian Association of Open Universities (AAOU), International Council for Distance Education (ICDE) इत्यादी.

या विद्यापीठाचे ध्येय “ लोक विद्यापीठ “ होण्याचे आहे. विद्यापीठाचा सातत्याने असा प्रयत्न आहे की समाजातील ज्यांच्या पर्यंत शिक्षण पोचले नाही त्यांच्यापर्यंत पोचून प्रमाण पत्र ते पदव्युत्तर असे गरजेनुसार शिक्षण द्यावे. य.च.म.मु.वि चे मुख्यालय माषिक येथे आहे. 8 विभागात विभागीय केंद्र आणि राज्यभर पसरलेली १७११ अध्ययनार्थी मार्गदर्शन केंद्रे आहेत.    

महाराष्ट्राला शैक्षणिक परिवर्तन करणाऱ्या अनेक महान व्यक्तींची परंपरा आहे. जसे की महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ आणि अन्य थोर विचारवंत. त्यांचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक परिवर्तनात महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रास मुक्त विद्यापीठाची गरज भासणे त्यास अनुसरूनच आहे.

हे विद्यापीठ 1 जुलै १९८९ रोजी शासनाच्या कायदा क्रमांक XX (1989) अन्वये स्थापन झाले व महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक विकासाला चालना दिलेल्या यशवंतराव चव्हाण यांचे नाव या विद्यापीठास देण्यात आले.    

महाराष्ट्र राज्य विधी मंडळ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी या विद्यापीठास अनेक प्रमाण पत्र, पदविका, आणि पदवी शिक्षणक्रम राबविण्यास अनुमती दिलेली आहे. हे विद्यापीठ शिक्षणक्रमाचादर्जा उच्च राहण्यासाठी शिक्षणक्रम विकासानापासून विद्यार्थ्याच्या मूल्य मापनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर काळजी घेते

या विद्यापीठाच्या सर्व पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांची मान्यता आहे. त्यामुळे नोकरी अथवा पुढील शिक्षणासाठी अन्य विद्यापीठांकडे उपलब्ध असलेल्या त्या शिक्षण क्रमांशी ते पूर्णपणे समकक्ष आहेत. त्या अनुषंगाने, हे विद्यापीठ देशातील सर्व अन्य मान्यताप्राप्त विद्यापीठाशी समकक्ष आहे.