विद्याशाखा / विभाग

 

विभागीय केंद्र

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

शैक्षणिक विकास आणि पुनर्रचनेचा महाराष्ट्राला फोर मोठा वारसा आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या थोर विचारवंतांचे या राज्यातील शैक्षणिक विकासाच्या चळवळीत मोठे योगदान आहे. याच परंपरेला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या विधीमंडळाने  १ जुलै १९८९ रोजी विशेष कायदा क्रमांक २० अन्वये या विद्यापीठाची स्थापना करून त्यास महाराष्ट्राचे थोर नेते व आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले.

कायदा क्रमांक २०(१९८९) ने प्राप्त करून दिलेल्या वैधानिक दर्जामुळे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिल्या मुळे या विद्यापीठास विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक अशा पातळीवरील शिक्षणक्रम उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. शिक्षांक्रम विकसित करण्यापासून परीक्षा घेण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर उत्तम काळजी घेतल्यामुळे शिक्षणक्रमांचा दर्जा राखणे शक्य झाले आहे. या शिक्षणक्रमांचे विकसन अशा प्रकारे करण्यात आले आहे की ते अन्य विद्यापीठांशी समकक्षता राखू शकतील, तसेच प्रमाणपत्र दर्जाचे काही असे स्वतंत्र शिक्षणक्रम विकसित करण्यात आले आहेत की ते अन्य विद्यापीठांत उपलब्ध नाहीत. या स्तरावरील शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यास तो उत्तीर्ण झाल्या बरोबर दिले जाते. त्यासाठी पदवीप्रदान कार्यक्रमाची गरज नसते.

...पुढे वाचा

ध्येय

हे विद्यापीठ ‘लोकविद्यापीठ व्हावे’

उद्दिष्टे

शास्त्रशुद्ध संप्रेषणाचा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, दूरशिक्षण पद्धतीने तांत्रिक, व्यावसायिक, रोजगाराभिमुख व जीवनोपयोगी शिक्षणक्रम देण्यासाठी नाविन्यपूर्ण व लवचिक दूरशिक्षण पद्धती विकसित करणे.  

या विद्यापीठाची खास वैशिष्ट्ये

  • रोजगाराभिमुख व तांत्रिक कौशल्यावर भर
  • अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर
  • सुलभ प्रवेश, शिक्षणक्रमांच्या निवडीचे स्वातंत्र्य, श्रेयांकांतर लाभ
  • सर्वदूर अभ्यास केंद्रांची सहज उपलब्धता
  • मूल्यमापनाची शास्त्रशुद्ध पद्धत
  • दर्जेदार शिक्षणावर विशेष भर
  • अनुभवपूर्ण सखोल संशोधनावर निष्ठा
  • अन्य विद्यापीठात व व्यावसायिक संस्थांत या विद्यापीठाच्या शिक्षणाला समकक्षता
  • जागतिक संस्थांशी संधान
Shri Ramesh Bais
श्री रमेश बैस

माननीय कुलपती

पुढे वाचा...
Sanjeev Sonawane
मा. प्रा.संजीव सोनवणे

कुलगुरू

पुढे वाचा...
श्री. बी.पी. पाटील
श्री. बी.पी. पाटील

कुलसचिव (प्रभारी)

पुढे वाचा...