INDRADHADHANUSHYA – The Cultural festival

इंद्रधनुष्य सांस्कृतिक महोत्सव

संचालकांचे मनोगत

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि त्यांच्यातील सुप्त क्रीडा व सांस्कृतिक गुणांना वाव मिळावा या उद्देशाने विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राची  स्थापना करण्यात आलेली आहे. या विभागा अंतर्गत दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांच्या स्पर्धांचे विद्यापीठ पातळीवरील राज्य स्तरीय आयोजन केले जाते. यातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे राज्य स्तरीय अंतर विद्यापीठ पातळीवरील युवक महोत्सव – इंद्रधनुष्य - आणि अश्वमेध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पाठविले जाते. विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील सर्व अभ्यासकेंद्रांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी प्रथम विभागीय केंद्र पातळीवर क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांच्या स्पर्धा होतात, त्यातून निवड झालेले विद्यार्थी राज्य स्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होतात.

मुक्त शिक्षण पद्धतीने उच्च शिक्षण देणारे हे बहुधा पहिलेच विद्यापीठ आहे. या विद्यापीठात शिक्षणाबरोबर व्यक्तिमत्व विकासास बरोबरीने महत्व दिले जाते. विद्यार्थीही त्याचा हिरीरीने लाभ घेतात.

विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कलागुणांचा आदर करणाऱ्या या विद्यापीठाने क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांसाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांचा स्पर्धांसाठी होणारा प्रवास व निवास खर्च, प्रत्यक्ष स्पर्धांचे आयोजन, विद्यार्थ्यांना द्यावयाचे क्रीडा गणवेश, सराव प्रशिक्षण कालावधीतील निवास, भोजन व स्पर्धा आयोजन इत्यादी खर्च केला जातो.

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करते.

प्रा. डॉ. विजया पाटील

(संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                               विद्यापीठाचे विविध पुरस्कार

मराठी भाषेचे सन्मानपूर्वक व आदराने जतन करणे, मराठी भाषेतील संप्रेषण वृद्धिंगत करणे, मराठी साहित्याचा गौरव करणे, साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार करणे आणि नवोदित साहित्यिकांचा सन्मान करणे या साठी  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून दरवर्षी पुढील प्रमाणे विविध पुरस्कारांचे प्रदान करण्यात येते. त्याचे आयोजन विद्यार्थी कल्याण व बहिःशाल  केंद्र करते.

या पुरस्कारांच्या वाटप प्रसंगी महाराष्ट्राच्या जडण घडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या ज्येष्ठ धुरीणांच्या नावाने व्याख्यानमालेचे आयोजन विद्यार्थी कल्याण व बहिःशाल  केंद्र करते.

कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार

भारतीय साहित्य निर्मितीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या साहित्यिकास हा पुरस्कार दिला जातो. १ लाख रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे.

विशाखा काव्य पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण स्मृतिव्याख्यान

नवोदित कवीच्या गेल्या वर्षात प्रकाशित झालेल्या व प्रथम कविता संग्रहास हा पुरस्कार दिला जातो. २१०००, १५०००,       १०००० स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे त्याचे स्वरूप असते.

बाबुराव बागूल स्मृति पुरस्कार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृति व्याख्यान

गेल्या वर्षात प्रकाशित झालेल्या कथाकाराच्या पहिल्या कथा संग्रहास हा पुरस्कार दिला जातो. २१००० रोख      स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे त्याचे स्वरूप असते.

सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या सामाजिक संस्थेचा गौरव करून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ दरवर्षी अशा एका संस्थेस  पुरस्कार प्रदान करते.

या पुरस्कारांच्या वाटप प्रसंगी महाराष्ट्राच्या जडण घडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या ज्येष्ठ धुरीणांच्या नावाने व्याख्यानमालेचे आयोजन विद्यार्थी कल्याण व बहिःशाल  केंद्र करते.

रुक्मिणी पुरस्कार आणि महात्मा ज्योतिरव फुले स्मृतिव्याख्यान

        महाराष्ट्र राज्यात गेल्या दशकात कर्तृत्वाचा ठसा निर्माण करणारी महिला, तिची भरीव   कामगिरी, जनमानसातील प्रतिमा, सचोटी, सार्वजनिक जीवनातील चारित्र्य यांच्यावर  हा पुरस्कार आधारित असतो. २१००० रोख  स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे त्याचे   स्वरूप असते.

पंजाबराव देशमुख स्मृतीपुरस्कार

        पारंपरिक शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कार्य करणार्‍या संस्थेस किवा व्यक्तीस दरवर्षी आलटून पालटून हा पुरस्कार देण्यात येतो. वैचारिक लेखन, संशोधन, प्रकल्प, प्रयोग असे कार्य संस्था किवा चळवळीद्वारे व्यक्तीने / संस्थेने असल्यास हा पुरस्कार दिला  जातो. २१००० रोख  स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे त्याचे स्वरूप असते.

ज्ञानदीप पुरस्कार

दुराशिक्षण क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तिला किवा संस्थेस देण्यात येतो. २१००० रोख      स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे त्याचे स्वरूप असते.

श्रमसेवा पुरस्कार

श्रम आणि सेवेने उपेक्षित वर्गातल्या महिलांची उन्नती करणार्‍या महिलेला किवा महिला संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. २१००० रोख  स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे त्याचे स्वरूप असते.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                         कुसुमाग्रज अध्यासन माहिती (CLICK HERE)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------