शैक्षणिक

शैक्षणिक

विद्याशाखा :
विद्याशाखा प्रामुख्याने विविध शिक्षणक्रम विकसित करण्यासाठी स्थापन केलेल्या आहेत. त्यामध्ये पाठ्क्रम तयार करणे, पुस्तके व दृक्श्राव्य माध्यमातून, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच अन्य विविध तांत्रिक माध्यमांचा वापर करून  प्रभावीपणे शिक्षण देण्यासाठी अध्ययन साहित्य निर्मिती करण्याचा समावेश असतो. सध्या विद्यापीठात अशा ८ विद्याशाखा आहेत. त्या प्रत्येक विद्याशाखेस एक संचालक तसेच त्या विद्याशाखेशी संबंधित शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी आहेत. 

विभाग :
विभाग हे प्रामुख्याने विद्यापीठाचे प्रशासकीय कार्य पाहतात. त्यात उपविभाग व केंद्र आहेत. प्रत्येक विभागात एक संचालक आहेत. केंद्र व उपविभागात शैक्षणिक तसेच प्रशासकीय कर्मचारी आहेत. विद्यार्थ्यांना उत्तम सेवा देता याव्यात यासाठी प्रत्येक विभाग हा विद्याशाखांशी सुसूत्रीकरण करून त्यांना आवश्यक त्या सेवा पुरवितात.