क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि त्यांच्यातील सुप्त क्रीडा व सांस्कृतिक गुणांना वाव मिळावा या उद्देशाने विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्रा अंतर्गत दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे राज्य स्तरीय आयोजन केले जाते. यातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे राज्य स्तरीय इंद्रधनुष्य आणि अश्वमेध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पाठविले जाते. विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील सर्व अभ्यासकेंद्रांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी प्रथम विभागीय केंद्र पातळीवर क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांच्या स्पर्धा होतात, त्यातून निवड झालेले विद्यार्थी राज्य स्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होतात.
विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कलागुणांचा आदर करणाऱ्या या विद्यापीठाने क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांसाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांचा स्पर्धांसाठी होणारा प्रवास व निवास खर्च, प्रत्यक्ष स्पर्धांचे आयोजन, विद्यार्थ्यांना द्यावयाचे क्रीडा गणवेश, सराव प्रशिक्षण कालावधीतील निवास, भोजन व स्पर्धा आयोजन इत्यादी खर्च केला जातो.
या विभागाच्या संचालक म्हणून प्रा.डॉ. विजया पाटील या काम पाहात आहेत. तसेच श्री. झालसे या कक्षातील प्रशासकीय काम पाहतात.
संपर्क – डॉ. दयाराम पवार (०२५३)२२३०१२७
श्री. झालसे (०२५३) २२३०१२७
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------