पुरस्कार, सन्मान आणि सहयोग

पुरस्कार, सन्मान आणि सहयोग

     विद्यापीठास मिळालेले पुरस्कार, बहुमान आणि सहयोग

 

                                      मुक्त विद्यापीठास जागतिक पातळीवरील बहुमान (2019)

 

कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या जगभरातील ५३ कॉमनवेल्थ देशांतील मुक्त व दूरशिक्षण संस्थांच्या सर्वोच्च संस्थेने नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला अवार्ड ऑफ इन्स्टिट्यूशनल एक्सलन्स या पुरस्काराने सन्मानित केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन आणि कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी स्कॉटलंड मधील एडिनबर्ग येथे एका भव्य समारंभात हा पुरस्कार स्वीकारला (Sep-2019). ह्या पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या समितीने एकमुखाने प्रशंसा करताना या विद्यापीठाने अत्यंत अल्पावधीत तंत्रज्ञानाचा वापर करून लक्षावधी विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीरीत्या पोचल्याचे पाहून आपण प्रभावित झाल्याचे नमूद केले आहे.

विद्यापीठास सन्मानपूर्वक दिलेल्या मानपत्रात कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगने पुढील मुद्द्यांचा उल्लेख करून प्रशंसा केली आहे

तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

विद्यार्थ्यांच्या नोंदणीपासून प्रमाणपत्र वितरणापर्यंत संगणकीय तंत्राचा वापर

शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुशल व कार्यक्षम मनुष्यबळ विकासित करणे

२००२मध्ये प्रथम मिळालेल्या याच पुरस्कारपासून आजतागायत राखलेले प्रामाणिक प्रयत्नांचे

कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग ही संस्था जगभरातील ५३ कॉमनवेल्थ देशांच्या सरकारांनी १९८७ साली स्थापित केली. कॅनडाने या संस्थेचे यजमानपद स्वीकारले. शाश्वत व प्रगत विकासासाठी मुक्त व दूर शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचे नवे स्रोत निर्माण करणे व जगभरातील वंचीतांपर्यंत आधुनिक ज्ञानाचे भांडार पोचविणे हे उद्दिष्ट ठेवून ह्या संस्थेने अनेक माध्यमातून मुक्तशिक्षण संस्थांना मदतीचा हात दिला आहे. त्यातून मुक्त शिक्षण पद्धतीचा दर्जा, क्षमता आणि तंत्रज्ञानाचा वापर यांचा विकास करण्याचे कौशल्य संस्थांमध्ये निर्माण झाले. परिणामी मुक्त व दूरशिक्षणाची चळवळ सक्षमपणे उभी राहिली. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  • विद्यापीठ अनुदान आयोग आयोजित राष्ट्रीय स्तरावरील दृकश्राव्य चित्रफित स्पर्धेत १९९४ या वर्षी Insect Anatomy and Morphology या विषयावरील चित्रफितीसपुरस्कार मिळाला.
  • तळागाळातील महिलांच्या पुनरुत्थानासाठी शिक्षणक्रम विकसित करण्याबद्दल २००१ या वर्षी असोसिअशन ऑफ कॉमनवेल्थ युनिवर्सिटीज यांचा पुरस्कार मिळाला
  • कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग, कॅनडा यांच्या कडून  दूरशिक्षण पद्धतीत असामान्य कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट संस्थेचा बहुमान २००२ या वर्षी प्राप्त झाला
  • दूरशिक्षण पद्धतीतील शिक्षण घेण्यात आनंददायी अनुभव देणारी उत्कृष्ट संस्था म्हणून कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग, कॅनडा यांच्या कडून २००४ या वर्षी बहुमान 
  • जागतिक पातळीवरील मोठे विद्यापीठ म्हणून २००५ मध्ये बहुमान
  • जागतिक पातळीवरील पर्यावरण विषयक चित्रफितीच्या निर्मिती साठी फिनलंड येथील महोत्सवात २००६ या वर्षी पुरस्कार 
  • कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग, कॅनडा यांच्या कडून  दूरशिक्षण पद्धतीत असामान्य कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट संस्थेचा बहुमान 2019 या वर्षी प्राप्त झाला

 

AVC - Awards

  • BEST film award at UGCs national educational film competition 1994, produced and directed by Prashant Kulkarni. 
  • The film ‘A short story about Water ‘ received   international  award at Vaasa International film festival – Finland. Producer, director Mr Jagdish Kulkarni received this award  at  a grand event in the Scandinavian region. The film  also received award at Vatavarn Film festival (New Delhi )
  • The films ‘Discover of God’ (subject – Types of Pollution), written by Mr. Prafulla Chikerur and produced by Mr. Jagdish Kulkarni received award at Florida (USA, 2006)
  • Film  “Vasundhara Mitra”  Produced and Directed by  Mr Jagdish Kulkarni received this award on behalf of AVC team.

 

य.च.म.मु.विद्यापीठाकडून दिले जाणारे पुरस्कार

 

महाराष्ट्रातील उदयोन्मुख साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विशिश्त्य्पूर्ण समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा व संस्थांचा गौरव करण्यासाठी विविध पुरस्कार दिले जातात. 

विशाखा काव्य पुरस्कार :
ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविलेल्या श्री वि.वा.शिरवाडकर तथा तात्यासाहेब (कुसुमाग्रज) यांच्या नावाने महाराष्ट्रातील तीन उदयोन्मुख कवींना हा पुरस्कार देण्यात येतो. 

बाबुराव बागुल गौरव पुरस्कार :
नामवंत क्रांतीकारी लेखक कै. बाबुराव बागुल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रातील नवोदित लेखकाच्या मराठी लघुकथा संग्रहास हा पुरस्कार देण्यात येतो 

रुक्मिणी पुरस्कार :
समाजकार्यात आपला ठसा उमटविणाऱ्या महाराष्ट्रातील महिलेस हा पुरस्कार देण्यात येतो 

श्रमसेवा पुरस्कार :
समाजातील शोषित महिलांच्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलेला हा पुरस्कार देण्यात येतो

ज्ञानदीप पुरस्कार :
दूरशिक्षण पद्धतीने शिक्षण देण्यात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार :
पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस देण्यात येणारा हा पुरस्कार अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेने दिलेल्या आर्थिक योगदानातून देण्यात येतो 



 

आंतरराष्ट्रीय सहयोग

 

  • कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग, कॅनडा
  • कॉमनवेल्थ सेक्रेटरीएट, लंडन
  • आथाबास्का युनिवर्सिटी, कॅनडा
  • ववसान मुक्त विद्यापीठ , मालेशिया
  • द चार्टर्ड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ लंडन
  • इंटरनॅशनल फूड पॉलिसि रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल ओपन फूड अँड अग्रीकल्चर युनिवर्सिटी, यु.एस.ए. 

 


Click on the following links for detail information.

पुरस्कारांची नियमावली

इंद्रधनुष्य आयोजन पध्दती