Core Values

गाभा मूल्ये

प्रवेश संधी हे विद्यापीठ समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना वय, जात, स्तर, लिंग धर्म, भाषा, पंथ याचा विचार न करता शिक्षणाची समान संधी उपलब्ध करू देते 
वाजवी शुल्क   ज्या विद्यार्थ्यांना  अवाजवी खर्चामुळे उच्च शिक्षण घेता येत नाही त्यांना हे विद्यापीठ अत्यंत वाजवी शुल्कात उच्च शिक्षण उपलब्ध करून देते. 
रोजगार क्षमता  शिक्षणक्रमांची रचना रोजगार देणाऱ्या संस्थेस उपयुक्त मनुष्यबळ मिळेल या पद्धतीने केलेली आहे. आणि या माध्यमातून रोजगार वाढवून व्यावसायिक जगात पात्रता मिळवून देणारी आहे.
लवचिकता प्रवेशाच्या अटी शिथिल करणे, प्रत्यक्ष अध्ययनाची व्यवस्था करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे या पद्धतीने लवचिकता आणली आहे
सर्वसमावेशकता शेतकरी, गरीब ग्रामीण जनता, कैदी, इत्यादी सर्वांना सामावून घेणारी ही संस्था आहे.