अभिनव उपक्रम

अभिनव उपक्रम

उपग्रहाव्दारे शिक्षण : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) यांच्या सहकार्याने एज्यु सॅट या उपग्रहामार्फत शिक्षण देण्याचा हा उपक्रम तंत्रज्ञानाचा  शिक्षणामध्ये वापर करण्याचा एक आदर्श ठरेल. या विद्यापीठाने राज्यभर अनेक आभासी शिक्षण केंद्रे सुरु केले आहेत. त्या प्रत्येक केंद्रावर दोन्ही बाजूने संवाद साधण्याची दृक्श्राव्य उपकरणे आहेत. विशिष्ट शिक्षणक्रमासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी तेथे ठराविक वेसेस उपस्थित राहतात. तज्ञ शिक्षक विद्यापीठाच्या मुख्यालयातील आठवा पुणे येथील स्टुडीओतून मार्गदर्शन करतात. ठीकठिकाणचे  विद्यार्थी यात सहभागी होतात. लवकरच या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर सर्व शिक्षणक्रमांसाठी केला जाणार आहे. 

व्हिडिओ ऑन डिमांड : 
स्पर्धा परीक्षांसाठी राबविलेल्या विशेष उपक्रमात प्रत्येकी २ तासांचे ३० व्हिडिओ कार्यक्रम वेबसाईट मार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयोग करण्यात आला. अभ्यास केंद्रांनीही विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून हे कार्यक्रम पाहण्याची सुविधा उप्लाभ्द करून दिली होती.  मागणी करताच हवा त्या विषयाचा कार्यक्रम पाहता यावा हा त्याचा उद्देश. लवकरच हा उपक्रम सर्व शिक्षणक्रमांसाठी राबविण्यात येणार आहे. 


पर्यावरण जागृती कार्यक्रम :
५ जून – जागतिक पर्यावरण दिन , या निमित्ताने विद्यापीठाने एक उपक्रम हाती घेतला. विद्यापीठाच्या ‘ओपन सोर्स’ व्दारे पर्यावरणाच्या रक्षणासाठी माहिती देणारे ३० व्हिडिओ कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले. तसेच ह्या कार्यक्रमाचे संच महत्वाच्या ठिकाणी वाटप करण्यात आले. पद्मश्री सुंदरलाल बहुगुणा, डॉ. माधव चितळे, डॉ. आनंद कर्वे यांचा त्यात सहभाग आहे. शालेय स्तरावर पर्यावरण शिक्षण देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यालयाने दिलेल्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महत्वाचा आहे.   

मोबाईल लर्निंग सेंटर :
तळागाळातील लोकांपर्यंत ज्ञानगंगा पोचविण्याचे धोरण असलेल्या या विद्यापीठाने मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दूरवरच्या पाड्यांवर संगणकाचे शिक्षण देण्याचा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला. या व्हॅनमध्ये ६ संगणक असून एका वेळी १२ विद्यार्थी बसण्याची सोय आहे. यातील प्रोजेक्टर चा वापर करून एका वेळी ५० विद्यार्थ्यांना शिक्षण देणे शक्य झाले आहे. नाशिक जवळील ननाशी नावाच्या छोट्याशा गावातील ५० विद्यार्थ्यांनी नोंदणी करून या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. 

 
कृषी विज्ञान केंद्र : 
भारतीय कृषी संशोधन परिषद (आय.सी.ए.आर.) यांनी १९९४ मध्ये या विद्यापीठात कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली.

कृषी क्षेत्रातील हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम असून त्या व्दारे शेतकरी व कृषी उद्योजकांना मार्गदर्शन केले जाते. तळागाळातील शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देऊन ग्राम विकास साधण्याचा हा प्रकल्प आहे. शास्त्र शुद्ध मार्गदर्शनासाठी कृषी विज्ञान केंद्राने एका ‘आदर्श शेता’ची  निर्मिती केली आहे. विद्यापीठ परिसरातील या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीत माती व पाणी परीक्षण प्रयोग शाळा, फायटो डायग्नोस्टिक्स, पोस्ट हार्वेस्ट टेक. प्रयोगशाळा आणि कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आहे. ३० शेतकऱ्यांची निवास व्यवस्था या ठिकाणी आहे. या केंद्रात अत्याधुनिक शेतीचे प्रशिक्षण देण्या बरोबरच कीड नियंत्रण, रोग नियंत्रण याचेही प्रशिक्षण दिले जाते. गांडूळखत तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या सहभागाने ग्राम दत्तक योजनेव्दारे मोठ्या प्रमाणावर आधुनिक शेतीचे प्रशिक्षण दिले जाते.


दाई प्रशिक्षण कार्यक्रम : 
आरोग्य शिक्षण उपक्रमांतर्गत दाई प्रशिक्षण हा एक अभिनव उपक्रम विद्यापीठाने हाती घेतला आहे. पुरेसा विकास झालेला नसल्याने भारतातील निम्मी बाळंतपणे घरीच होतात. विशेषतः आदिवासी व अति दुर्गम भागात हे प्रमाण आधी आहे. त्या ठिकाणी सुरक्षित बाळंतपणे करण्यासाठी दाई प्रशिक्षण हा १० श्रेयान्कांचा शिक्षणक्रम विद्यापीठाने विकसित केलेला आहे. 

आरोग्य मित्र शिक्षणक्रम :
भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजने अंतर्गत ठीक ठिकाणी स्थापन झालेल्या ‘आशा’ प्रशिक्षणासाठी या विद्यापीठाने आरोग्य मित्र हा १६ श्रेयान्कांचा शिक्षणक्रम विकसित केला.