पार्श्वभूमी

पार्श्वभूमी

शैक्षणिक विकास आणि पुनर्रचनेचा महाराष्ट्राला फोर मोठा वारसा आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या थोर विचारवंतांचे या राज्यातील शैक्षणिक विकासाच्या चळवळीत मोठे योगदान आहे. याच परंपरेला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या विधीमंडळाने  १ जुलै १९८९ रोजी विशेष कायदा क्रमांक २० अन्वये या विद्यापीठाची स्थापना करून त्यास महाराष्ट्राचे थोर नेते व आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले.

कायदा क्रमांक २०(१९८९) ने प्राप्त करून दिलेल्या वैधानिक दर्जामुळे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने कलम १२, यु.जी.सी. अॅकट, १९५६ अन्वये मान्यता दिल्या मुळे या विद्यापीठास विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक अशा पातळीवरील शिक्षणक्रम उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.