विभागीय केंद्रातील
या विद्यापीठाने नाशिक, मुंबई, पुणे, अमरावती, नांदेड, नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या ठिकाणी प्रत्येकी एक विभागीय केंद्र स्थापन केले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सहाय्य करणे, अभ्यास केंद्रांचे पर्यवेक्षण व सुसूत्रीकरण करणे हे विभागीय केंद्रांचे कार्य आहे. विभागीय केंद्रांमध्ये पुढील सुविधा आहेत.
- जागा व इमारत : वेगवेगळ्या विभागीय केंद्रांच्या इमारतीचे स्वरूप वेगवेगळे आहे. अमरावती व औरंगाबाद व नांदेड विभागीय केंद्राची स्वतःची इमारत आहे. तर अन्य विभागीय केंद्रे दीर्घकालीन भाडे तत्वावर घेतलेल्या जागांमध्ये आहेत. त्या ठिकाणी कार्यालयीन साहित्य, संगणक, इन्टरनेट इत्यादी उपलब्ध आहे.
- मनुष्यबळ: प्रत्येक विभागीय केंद्रावर एक विभागीय संचालक आणि प्रशासकीय कर्मचारी आहेत.
- वाहन सुविधा: पर्यवेक्षण, सुसूत्रीकरण तसेच साहित्य वाहतुकीसाठी प्रत्येक विभागीय केंद्रावर स्वतंत्र वाहन उपलभ आहे.