संशोधन विभाग

संशोधन विभाग

संशोधन क्षेत्रातील शिक्षणक्रम राबविण्यासाठी य च म मु वी च्या संशोधन विभागाची स्थापना १९९४ मध्ये झाली. ह्या विभागाचे कार्य संशोधन समितीच्या मार्गदर्शनाखाली चालते. २०१९ च्या संशोधन पदवीच्या तुकडीत ६४ विद्यार्थ्यांनी, ५ गटात विविध विद्याशाखांतर्गत नोंदणी केली होती. 

दूरशिक्षण या विस्यायाव्र लक्ष केंद्रित करून या विद्यापीठाच्या संशोधन कार्याची कक्षा विविध शैक्षणिक विभाग व अंतर शैक्षणिक विभाग यांमध्ये लेखी आणि प्रात्यक्षिकांसाठी वाढविण्यात आली. य.च.म.मु.वी. फक्त विद्या वाचस्पती हा शिक्षणक्रम नियमित पद्धतीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांप्रमाणे राबविते. या विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे मूळ उद्दिष्ट सैद्धांतिक संकल्पनावर लक्ष केंद्रित करून अनुभवजन्य प्रत्यक्ष कार्याशी त्याची सांगड घालणे हे असून शिक्षणशास्त्र, दूर शिक्षण, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, मानव्य विद्या, वाणिज्य व व्यवस्थापन, कृषी, व अन्य विभागातील संशोधकांना त्याचा लाभ देणे हे आहे.

संशोधन समितीने संशोधन पदवीसाठी मार्गदर्शक तत्वे आखलेली असून त्यात साहित्य चोरी विरोधी उपाय, पदवी प्रदान, INFLIBNET व्दारे प्रबंध सादरीकरण, शोध गंगा आणि पदवी प्रदान, शिष्यवृत्ती, किरकोळ संशोधन प्रकल्प, कार्यशाळा. परिषदा, परिसंवाद इत्यादीचे आयोजन व सहभाग इत्यादीचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना संशोधन नियमावलीचे आकलन होण्यासाठी विद्याशाखांमार्फत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात.

या विद्यापाठाने सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त संशोधन शिष्यवृत्तीची योजना आखलेली असून त्या मध्ये पूर्णवेळ विद्यार्थ्यांना वित्त सहाय्य देण्यात येते. या मध्ये निवड झालेल्या संशोधन विद्यार्थ्यास ५ वर्षांसाठी रु. २५,००० दरमहा देण्यात येतात. हे विद्यार्थी विद्यापीठाने नेमलेल्या संशोधन समिती मार्फत सर्व निकषांचे पालन करून निवडले जातात.