कृषी विज्ञान केंद्र : विद्याशाखेची माहिती

विद्याशाखेची माहिती

कृषी विज्ञान केंद्र : भारतीय कृषी संशोधन परिषद (आय.सी.ए.आर.) यांनी १९९४ मध्ये या विद्यापीठात कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली.

कृषी क्षेत्रातील हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम असून त्या व्दारे शेतकरी व कृषी उद्योजकांना मार्गदर्शन केले जाते. तळागाळातील शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देऊन ग्राम विकास साधण्याचा हा प्रकल्प आहे. शास्त्र शुद्ध मार्गदर्शनासाठी कृषी विज्ञान केंद्राने एका ‘आदर्श शेता’ची  निर्मिती केली आहे. विद्यापीठ परिसरातील या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीत माती व पाणी परीक्षण प्रयोग शाळा, फायटो डायग्नोस्टिक्स, पोस्ट हार्वेस्ट टेक. प्रयोगशाळा आणि कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आहे. ३० शेतकऱ्यांची निवास व्यवस्था या ठिकाणी आहे. या केंद्रात अत्याधुनिक शेतीचे प्रशिक्षण देण्या बरोबरच कीड नियंत्रण, रोग नियंत्रण याचेही प्रशिक्षण दिले जाते. गांडूळखत तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या सहभागाने ग्राम दत्तक योजनेव्दारे मोठ्या प्रमाणावर आधुनिक शेतीचे प्रशिक्षण दिले जाते.

 

        अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र - नाशिक यांचे  संकेतस्थळ बघावे.

 

                           Click Here to view KVK-Nashik Wesbite