विद्यार्थी सेवा विभाग
विद्यार्थी सेवा विभाग विभागाविषयी
विद्यार्थी सेवा विभागात विभागीय व अभ्यासकेंद्र व्यवस्थापन केंद्र तसेच पुस्तक भांडार यांचाही समावेश आहे. नवीन अभ्यासकेंद्र देण्याची संपूर्ण प्रक्रिया करणे, विभागीय केंद्रांमार्फत अभ्यास केंद्रातील समंत्रण, पुस्तक वाटप व परीक्षा आयोजन यांचे सुसूत्रीकरण करणे, विभागीय केंद्रांचे हिशेब तपासणी व दैनंदिन व्यवहार यांचे व्यवस्थापन करण्याचे मुख्य कार्य विद्यार्थी सेवा विभाग करतो. आता, विद्यार्थी तक्रार निवारण, परीक्षा गैरव्यवहार शोधन समिती समोरील विद्यार्थ्यांच्या मुलाखती इत्यादी कार्येही विभागीय केंद्रावर केली जातात.