विद्यापीठांतर्गत आयोजित केलेल्या बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धेविषयी

विद्यापीठांतर्गत आयोजित केलेल्या बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धेविषयी

हाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत विकसित महाराष्ट्र 2047 चे Vision Document तयार करण्यात येत आहे. त्या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्थेचे आयोजन  विद्यापीठ स्तरावर करणेबाबत सूचित केले आहे. दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयातील अ.क्र. 6 नुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागामर्फत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे -

(1)         स्पर्धक : विद्यापीठातील सर्व नियमित, करारावरील, दैनंदिन वेतनावरील व प्रशिक्षणार्थी या संवर्गातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय सदर स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र आहेत.

(2)         बोधचिन्हाचा आकार :  2x2 इंच, 300 डीपीआय, Jpeg format, maximum file Size below 1 MB

(3)         घोषवाक्य : प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार मुद्यांवर आधारीत असावे. शब्द मर्यादा : 5 ते 10 शब्द असावे.

(4)         बोधचिन्ह व घोषवाक्य ऑनलाईन पद्धतीने https://shorturl.at/mqS9z येथे सादर करावे.

(5)      बोधचिन्ह व घोषवाक्य सादर करण्याचा अंतिम कालावधी - दिनांक 28 जुलै 2025 संध्या. 5 पर्यंत.

(6)         भाग घेणारे स्पर्धक बोधचिन्ह आणि घोषवाक्य हे दोनही अथवा यापैकी एक सादर करू शकतील.

(7)         स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांमधून बोधचिन्ह व घोषवाक्यासाठी स्वतंत्रपणे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडले जातील व प्रथम क्रमांकास रोख रु. 3000/-, द्वितीय क्रमांकास रोख रु. 2000/- व तृतीय क्रमांकास रोख रु. 1000/- आणि स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. उर्वरित पात्र स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र ऑनलाईन प्रदान करण्यात येईल.

(8)         निवड समितीचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.